फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून महिलेची बदनामी करणाऱ्या तरूणाला सायबर पोलीसांनी मंगळवारी खरवंडी (ता़ पाथर्डी) येथून अटक केली आहे. गणेश नामदेव बांगर (वय २०) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. ...
प्लॉटच्या खरेदी खताची नोंद लावण्यासाठी १४ हजाराची लाच घेताना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील मंडलाधिकारी उल्हासराव यशवंत कवडे यास १४ हजार रुपयांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपतच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. ...
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांत विस्थापित झालेल्या गुरुजींना अखेर शाळा मिळाल्या आहेत. जिल्ह्यातील ५३१ शिक्षकांच्या बदलीचा आदेश मंगळवारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून, बुधवारी शिक्षकांना तालुका मुख्यालयातून नियुक्तीचा आदेश दिला ...
औषधी व गुणकारी फळांचा दर्जा असणाऱ्या जांभळाच्या झाडांची संख्या कमालीची घटल्याने हे फळ आता दुर्मिळ बनत आहे. जुन्या झाडांची झालेली तोड आणि नव्या झाडांच्या लागवडीकडे कल कमी झाल्याने फळांच्या बाजारातून जांभूळ जवळपास गायब होण्याच्या मार्गावर आहे. नगरच्या ...
महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या दालनातील फर्निचरचे १५ लाख रुपयांचे बिल पाठपुरावा करूनही न मिळाल्याने एका ठेकेदाराने मंगळवारी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या दालनातील सोफे पळविले. ...
शेवगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षा विद्या लांडे यांच्यावरील अविश्वास ठराव मंगळवारी फेटाळण्यात आला. हा ठराव संमत होण्यासाठी १६ नगरसेवकांची आवश्यकता होती. मात्र बैठकीस १४ नगरसेवक उपस्थित राहिल्याने हा ठराव फेटाळण्यात आल्याचे प्रांताधिकारी डॉ. विक्रम बां ...
मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सध्या मराठवाड्यातील धरणांमध्ये ११.८७ टक्के पाणीसाठा आहे. गत महिन्यात १५ टक्के जलसाठा होता. ...