स्वाभिामानी शेतकरी संघटनेच्या दूध बंद आंदोलनाला दुसऱ्या दिवशी मंगळवारी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात ३ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून, पोलीस बंदोबस्तात १५० टँकर जिल्ह्याबाहेर पाठविले आहेत. ...
भंडारदरा-मुळा धरण पाणलोटासह तालुक्यातील आज्यापर्वत, कुमशेत, हरिश्चंद्रगड, रतनगड, घाटघर व अकोले शहर परिसरात पाच दिवसांपासून संततधार पावसाचे रुद्रावतारी तांडव सुरू आहे. ...
पिंपळगाव खांड धरण पूर्ण भरल्याने मुळा नदीच्या विसर्गात वाढ झाल्याने कोतूळसह परिसराचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र कोतुळेश्वर मंदिर गेल्या पाच सहा दिवसापासून पाण्यात गेल्याने भाविकांची दर्शनाची गैरसोय झाली आहे. ...
गुन्ह्यात नाव न घेण्यासाठी तब्बल ३ लाख रुपयांची लाच घेणा-या एका पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडण्यात आले. तर त्याचा साथीदार दुसरा पोलीस फरार झाला असून या दोघांविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दूध दरवाढीसाठी शेतक-यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. मात्र शेतक-यांनी आपले दूध ओतून नासाडी करण्याऐवजी घरातच तूप, लोणी, दही यासारखे दुग्धजन्य पदार्थ बनवावेत, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले आहे. ...
दुध संघांनी दूध संकलन बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान स्वाभिामनीचे उत्तर जिल्हाध्यक्ष रविंद मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांना शिर्डी पोलिसांनी पहाटेच ताब्यात घेतले आहे. ...