पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:25 IST2021-08-24T04:25:22+5:302021-08-24T04:25:22+5:30

शहरातील संपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या आध्यत्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांच्या उपस्थितीत पद्मश्री विखे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार ...

Padma Shri Dr. Greetings to Vitthalrao Vikhe Patil | पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना अभिवादन

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना अभिवादन

शहरातील संपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या आध्यत्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांच्या उपस्थितीत पद्मश्री विखे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. भाजपाचे संगमनेर तालुका अध्यक्ष डॉ. अशोक इथापे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुळवे, वसंत देशमुख, वसंत गुंजाळ, डॉ. सोमनाथ कानवडे, रखमाजी खेमनर, संदीप घुगे, अमोल खताळ, किसान मोर्चाचे अध्यक्ष सतीष कानवडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीराज डेरे, वैभव लांडगे, हरीष वलवे, ॲड. संदीप जगनर आदी यावेळी उपस्थित होते.

तालुक्यातील आश्वी येथील अभिवादन कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या ॲड. रोहिणी निघुते, प्रवरा बँकेचे अध्यक्ष अशोक म्हसे, भाऊसाहेब जऱ्हाड, किशोर जऱ्हाड, फळे भाजपाला सोसायटीचे उपाध्यक्ष शाळीग्राम चंद, ज्ञानेश्वर वाकचौरे, भाजप ओबीसी मोर्चाचे सचिव अशोक जऱ्हाड, हरिभाऊ ताजणे, जानकीराम गायकवाड, राजेंद्र मुळे, गंगाधर गायकवाड, विजय म्हसे, भीमा शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Padma Shri Dr. Greetings to Vitthalrao Vikhe Patil