पाचपुते-नागवडेंची एकी

By Admin | Updated: May 31, 2016 23:08 IST2016-05-31T23:01:41+5:302016-05-31T23:08:41+5:30

श्रीगोंदा : तालुक्याच्या राजकारणात आ़ राहुल जगताप यांच्या वाढत्या सत्ता वर्चस्वाला शह देण्यासाठी राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव

Pachpute-Nagvadenchi Ekki | पाचपुते-नागवडेंची एकी

पाचपुते-नागवडेंची एकी

श्रीगोंदा : तालुक्याच्या राजकारणात आ़ राहुल जगताप यांच्या वाढत्या सत्ता वर्चस्वाला शह देण्यासाठी राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे व माजी मंत्री बबनराव पाचपुते एकत्र येणार असून, आगामी नगराध्यक्षपदाची निवडणूक या नव्या आघाडीची नांदी ठरणार आहे़
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी पाचपुते विरोधकांची वज्रमूठ बांधली़ यामध्ये शिवाजीराव नागवडे यांनी काँगे्रस पक्षाची उमेदवारी नाकारुन राहुल जगताप यांना पाठिंबा दिला़
विधानसभा निवडणुकीनंतर विकास कामे आणि राजकीय डावपेचाच्या माध्यमातून जगताप यांनी तालुक्यावर पकड मिळविण्यात आघाडी घेतली़ मागील पंधरवड्यात राजेंद्र नागवडे यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचा दौरा करुन अनेक प्रश्नांना हात घातला़ तसेच विद्यार्थी, शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला़ पाचपुते यांच्या मदतीने जगतापांचे वर्चस्व कमी करण्यासाठी राजेंद्र नागवडेंनीही पुढाकार घेतला आहे़ या राजकीय समीकरणाची तालुक्यात चर्चा आहे.
(तालुका प्रतिनिधी)
अशा झाल्या वाटाघाटी
जिल्हा बँक निवडणुकीतील मानहानीचा वचपा काढण्यासाठी बाजार समिती निवडणुकीत बाळासाहेब नाहाटा यांना हद्दपार करण्यासाठी नागवडे-पाचपुते एकत्र येणार असल्याचे संकेत दिले जात आहेत़ बाजार समितीचे सभापतीपद नागवडे गटाला तर श्रीगोंदा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद पाचपुते गटाला देण्यावर एकमत झाल्याचे सांगितले जात आहे़ त्यामुळे नगराध्यक्षपदी भाजपाच्या सुनीता शिंदे यांचा मार्ग मोकळा झाला आहे़

Web Title: Pachpute-Nagvadenchi Ekki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.