लसीकरणाचा वेग वाढल्याने नागरिकांची गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:21 IST2021-09-13T04:21:09+5:302021-09-13T04:21:09+5:30

विसापूर : गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून कोरोना लसीकरणाचा वेग वाढल्याने पिंपळगाव पिसा व कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत लसीकरण केंद्रावर ...

As the pace of vaccination increased, so did the crowds of citizens | लसीकरणाचा वेग वाढल्याने नागरिकांची गर्दी ओसरली

लसीकरणाचा वेग वाढल्याने नागरिकांची गर्दी ओसरली

विसापूर : गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून कोरोना लसीकरणाचा वेग वाढल्याने पिंपळगाव पिसा व कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी ओसरू लागली आहे.

यापूर्वी मर्यादित लस उपलब्ध होत असल्याने नंबर टोकन घेण्यासाठी नागरिक पहाटेपासून रांगा लावत असत. आता मात्र लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे परिस्थिती निवळली असून रांगेत लोकांना ताटकळत उभे रहावे लागत नाही.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत एका दिवसात विक्रमी १५३४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी विसापूर २८२, निंबवी २८७, हिंगणी ३६४, अरणगाव २६३ व एरंडोली ३६२ याप्रमाणे गावोगावी लसीकरण करण्यात आले, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. जयदेवी राजेकर व डॉ. तबसूम पठाण यांनी दिली.

शनिवारी कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ९१६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ८५७ जणांना पहिला तर ५९ जणांना दुसरा डोस मिळाला. यामध्ये कोळगाव २८७, चिखली ४२२, घुटेवाडी २०७ या प्रमाणे गावोगावी जाऊन लसीकरण केल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अमोल अडसरे व डॉ. प्राजक्ता निमसे यांनी दिली. विसापूर येथे गर्दी होऊ नये यासाठी सरस्वती विद्यालयात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी लसीकरण सुरळीत व्हावे, यासाठी विद्यालयाचे प्राचार्य सुभाष रणसिंग, रयत सेवक बँकेचे माजी संचालक सुरेश जठार, डॉ. विजय शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष शशिकांत गटणे, परिचारिका सुशीला जाधव, कविता गायकवाड, आशासेविका कविता कराळे, शोभा पारवे, अनिता शिंदे, ग्रामपंचायत सहायक शशिकांत म्हस्के, अंबर फडके, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: As the pace of vaccination increased, so did the crowds of citizens