अनाथ, वंचितांची सावली हिरावली
By Admin | Updated: July 7, 2016 23:25 IST2016-07-07T23:18:03+5:302016-07-07T23:25:20+5:30
अहमदनगर : राज्यातील बालगृहांमध्ये दाखल होणाऱ्या अनाथ, निराधार आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत महिला व बालविकास आयुक्तांनी नवीन आदेश काढला आहे़

अनाथ, वंचितांची सावली हिरावली
अहमदनगर : राज्यातील बालगृहांमध्ये दाखल होणाऱ्या अनाथ, निराधार आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत महिला व बालविकास आयुक्तांनी नवीन आदेश काढला आहे़ या आदेशाचा बागुलबुवा करीत बाल कल्याण समितीकडून फक्त अनाथ मुलांनाच बालगृहांमध्ये प्रवेश दिला जात आहे़ त्यामुळे काळजी व संरक्षणाची खरी गरज असलेली हजारो मुले-मुली निराधार झाली आहेत़
बाल कल्याण समितीसमोर आलेल्या बालकाला काळजी व संरक्षणाची खरच गरज आहे का, याची पडताळणी आवश्यक असते़ ही पडताळणी बालगृह चालविणाऱ्या संस्थेच्या अहवालावरुन न करता जिल्हा बाल संरक्षण अधिकारी किंवा परीविक्षा अधिकारी यांच्या अहवालावरुन करण्यात यावी़ हा अहवाल प्रत्यक्ष गृहभेट करुनच करावा, त्यानंतर त्या बालकाला काळजी व संरक्षणाची गरज आहे का, ती किती दिवसांसाठी आहे, हे ठरवावे़
त्यानुसारच समितीने प्रवेश करावा, असे आदेशात म्हटले आहे़ मात्र, सध्या सर्रास फक्त अनाथ मुलांनाच बालगृहात प्रवेश देण्यासाठी बालकल्याण समिती आग्रही असते़ समितीच्या या कामकंटाळेपणामुळे हजारो मुले-मुली काळजी व संरक्षणाची गरज असूनही सुविधेपासून वंचित राहत आहेत़
(प्रतिनिधी)