चंदुकाका ज्वेलमध्ये अलंकार महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:28 IST2021-09-10T04:28:09+5:302021-09-10T04:28:09+5:30
अहमदनगर : गणेशोत्सव, महालक्ष्मी सणाचे औचित्य साधून चंदुकाका ज्वेलने महालक्ष्मीसाठी जोड अलंकारांचा महोत्सव आयोजित केला आहे. ९ ते १९ ...

चंदुकाका ज्वेलमध्ये अलंकार महोत्सव
अहमदनगर : गणेशोत्सव, महालक्ष्मी सणाचे औचित्य साधून चंदुकाका ज्वेलने महालक्ष्मीसाठी जोड अलंकारांचा महोत्सव आयोजित केला आहे. ९ ते १९ सप्टेंबर या कालावधीत हा दहा दिवसांचा महोत्सव असून मजुरीवर १० टक्के सूट दिली जाणार आहे. महालक्ष्मीसाठी सोने-चांदीच्या दागिन्यांसाठी जोड महोत्सव होणार आहे. याशिवाय पसंत पडलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांची जोडी खरेदी करता येणार आहे. महालक्ष्मी, गौरीसाठी आवडलेल्या दागिन्यांचा एकच नग मिळतो. त्यामुळे ग्राहक नाराज होतात. सारखे दिसणारे किंवा सारख्या वजनाचे दागिने मिळणे कठीण होते. त्यामुळेच हा जोड महोत्सव आयोजित केला आहे, असे आयोजकांनी सांगितले. या महोत्सवांतर्गत खास चांदीमध्ये श्री गणेशाची आकर्षक मूर्ती १० ग्रॅमपासून ते १ किलोपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. पूजेसाठी लागणारे ताम्हण, ताट, वाटी, मोदक, निरांजन, समई, कलश, घंटी, दुर्वा, हार,पान, सुपारी,जानवे, कान, सोंड, बाजूबंद अशा चांदीच्या वस्तूंचा सेट उपलब्ध राहणार आहे. महालक्ष्मीसाठी १५० पेक्षा अधिक विविध प्रकारातील अलंकार मिळणार आहेत. यामध्ये राणीहार, येसूबाई, नथ, पोहाहार,चोकर, शाहीहार, गंठण, शिंपला, अक्काबाई डोरला, ठुशी, नेकलेस, टॉप्स, झुमका, बिंदी मिळणार आहे. चंदुकाका ज्वेल यांच्या ‘चलो दुबई’ योजनेला ग्राहकांची मोठा प्रतिसाद दिला. खास सुवर्णसमृद्धी योजना सुरू असून ११ महिने पैसे भरा व एक महिना मोफत मिळवा, अशी ही योजना असल्याचे पत्रकात म्हटले आहे. (वा. प्र.)
------------