सखी मंचतर्फे ‘श्रावण सोहळ्या’चे आयोजन
By Admin | Updated: August 19, 2014 23:28 IST2014-08-19T23:11:49+5:302014-08-19T23:28:02+5:30
लोकमत सखी मंचच्या वतीने सदस्यांसाठी श्रावण सोहळ्यात विविध मनोरंजन व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

सखी मंचतर्फे ‘श्रावण सोहळ्या’चे आयोजन
अहमदनगर : हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो. यानिमित्ताने लोकमत सखी मंचच्या वतीने सदस्यांसाठी श्रावण सोहळ्यात विविध मनोरंजन व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
लोकमत सखी मंच आयोजित, साईदीप ग्रुप प्रस्तुत ‘‘श्रावण सोहळा’’ या कार्यक्रमाचे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी खास सखी मंच सदस्यांसाठी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरिता एस.जी. कायगावकर ज्वेलर्स अॅण्ड सराफ हे गिफ्ट प्रायोजक आहेत.
या सोहळ्यात सदस्यांना उखाणा व चारोळी स्पर्धेत सहभाग घेऊन आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेच्या सहभागाकरिता नावनोंदणी करणे आवश्यक असून, सखी मंच ओळखपत्र आवश्यक आहे. दि. २१ आॅगस्ट २०१४ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यक्रमास्थळी ऐनवेळी नाव नोंदणी घेतली जाणार नाही. तसेच यावेळी आयएसडीटी कॉलेज, लालटाकी यांच्यातर्फे फॅशन शोही सादर करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या सखींना एस.जी. कायगावकर ज्वेलर्स यांच्या वतीने आकर्षक गिफ्टस् देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त सदस्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन सखीमंचने केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ८३०८१३४९३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
(प्रतिनिधी)