एलबीटीला शोधणार पर्याय

By Admin | Updated: June 12, 2014 00:09 IST2014-06-11T23:43:16+5:302014-06-12T00:09:55+5:30

अहमदनगर: एबीटी बंद करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरू आहे. एबीटी बंद झाला तर पर्याय काय याचा अजून तोडगा निघालेला नाही.

Option to look for LBT | एलबीटीला शोधणार पर्याय

एलबीटीला शोधणार पर्याय

अहमदनगर: एबीटी बंद करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरू आहे. एबीटी बंद झाला तर पर्याय काय याचा अजून तोडगा निघालेला नाही. एलबीटी, पारगमन व मुद्रांक शुल्क वसुलीतून महापालिकेला वर्षाकाठी ६२ कोटी रुपये मिळत आहे. शासनाकडून काय मिळते यावर महापालिकेची आर्थिक स्थिती अवलंबून असणार आहे. परंतु सद्यस्थिती पाहता एलबीटी रद्दचा निर्णय नगर महापालिकेला तोट्याचा ठरू पाहत आहे. मात्र यावर आता उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शासनाने एलबीटी रद्दचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील महापौर, आयुक्तांची बैठक मुंबईत घेतली. एबीटी ठेवायचा की आणखी काही निर्णय घ्यायचा यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकांना देण्याची भूमिका महापौर संग्राम जगताप यांनी मुंबईत मांडली. या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही पण स्थानिक व्यापाऱ्यांशी विचारविनीमय करण्याचे सांगितले आहे. त्यानंतर एलबीटी की अन्य पर्याय याचा निर्णय होणार आहे.
नगर महापालिकेकडे ७ हजार ५०० व्यापाऱ्यांची नोंदणी झाली आहे. या व्यापाऱ्यांकडून महापालिकेला वर्षाकाठी ३६ कोटी ६२ लाख रुपयांचा कर एलबीटीपोटी मिळतो. याशिवाय एक टक्का मुद्रांक शुल्काचे ५ कोटी ९ लाख आणि पारगमन वसुलीतून २१ कोटी ६ लाख रुपये मिळतात. जकात लागू असताना जकातीचे उत्पन्न यापेक्षाही कमी होते. नगरची जकात पहिल्यावर्षी ४२ कोटी त्यानंतर ४५,४८, ६१ आणि नंतर ९१ कोटीला गेली होती. ९१ कोटी काही महिनेच वसूल झाले. त्यानंतर लगेचच एलबीटी लागू झाला. नगर शहरात आणखी काही नवीन व्यापाऱ्यांची नोंदणी होऊन एलबीटीचा आकडा वाढेल, त्यामुळे नगर महापालिकेला एलबीटी सोईचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एलबीटी लागू करताना नगरच्या व्यापाऱ्यांचाही फारसा विरोध नव्हता. (प्रतिनिधी)
शुक्रवारी बैठक
एलबीटी संदर्भात नगर शहरातील व्यापाऱ्यांची बैठक शुक्रवार (दि.१३) रोजी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात विविध व्यवसायातील संघटनांचे पदाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. महापौर संग्राम जगताप यांनी या बैठकीचे आयोजन केले असून उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, महिला बालकल्याण समिती सभापती, आयुक्त व उपायुक्त या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
वर्ष एलबीटी मुद्रांक शुल्क पारगमन
२०१२-१३ २४.५३ कोटी ३.८९ कोटी १३.९३ कोटी
(जुलै २०१२ पासून एलबीटी लागू झाला)
२०१३-१४ ३६.६२ कोटी ५ कोटी ९ लाख २१ कोटी ६ लाख.

Web Title: Option to look for LBT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.