शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

विखे यांना भाजपामध्ये घेण्यास विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 12:25 IST

डॉ. सूजय विखे यांना भाजपामध्ये प्रवेश द्यायचा का? याची चाचपणी करण्यासाठीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे शनिवारी नगरला आले होते. मात्र या बैठकीत डॉ. विखे यांना भाजपामध्ये घेण्यास स्थानिक आमदारांनी विरोध केला आहे.

ठळक मुद्दे डॉ. विखे यांना भाजपामध्ये घेण्यास स्थानिक आमदारांनी विरोध केला आहे.विखे यांची पुन्हा एकदा राजकीय कोंडी निर्माण झाली आहे.राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे यांनी सातत्याने भाजपावर टीका केली आहे.

अहमदनगर - डॉ. सूजय विखे यांना भाजपामध्ये प्रवेश द्यायचा का? याची चाचपणी करण्यासाठीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे शनिवारी नगरला आले होते. मात्र या बैठकीत डॉ. विखे यांना भाजपामध्ये घेण्यास स्थानिक आमदारांनी विरोध केला आहे. उघडपणे बोलायला कोणी तयार नसले तरी खासगीत सर्वच आमदारांनी ही  बाब मान्य केली आहे.त्यामुळे विखे यांची पुन्हा एकदा राजकीय कोंडी निर्माण झाली आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे यांनी ८ मार्च रोजी मुंबईत भेट घेतली. यामध्ये त्यांनी भाजपातून अहमदनगर लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केल्याची माहिती आहे. मात्र सदर भेट बिगर राजकीय होती, विखे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रश्न घेऊन ते आल्याचे महाजन व विखे यांनी माध्यमांना सांगितले. या पार्श्वभूमीवर विखे यांना भाजपात घेण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी मंत्री महाजन हे शनिवारी नगरमध्ये होते. त्यांनी जिल्ह्यातील भाजप आमदारांशी चर्चा केली. यावेळी सर्वच आमदारांनी विखे यांना भाजपात घेण्यास विरोध दर्शविला. राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे यांनी सातत्याने भाजपावर टीका केली आहे. भाजपाचे खा. दिलीप गांधी यांच्यावरही ‘टक्केवारीचा खासदार’ म्हणून टीका केली आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावरही त्यांची टीका सुरू असते. विखे भाजपमध्ये आले तर ते पक्ष संघटना वाढविणार नाही, अशीही बाजू आमदारांनी महाजन यांच्यापुढे मांडली. हे सगळे मुद्दे घेऊन महाजन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे सध्या तरी विखे यांच्या भाजपा प्रवेशावर टांगती तलवार आहे.एकाच हेलिकॉप्टरने रवाना

विखे यांना पक्षात घेण्यास विरोध झाला असला तरी गिरीश महाजन आणि डॉ. सुजय विखे हे एकाच हेलिकॉप्टरमधून शनिवारी जळगावकडे रवाना झाले. दोघेही एकाच हेलिकॉप्टरमध्ये बसल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनीही पाहिले.भाजपात आल्यास शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदाचीही ऑफर महाजन  यांनी डॉ. विखे यांना दिल्याची चर्चा आहे. मात्र विखे यांनी अहमदनगर लोकसभेच्या उमेदवारीचा हट्ट कायम ठेवला आहे. विखे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत रविवारी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होणार आहे. लोकसभेची उमेदवारी ही दिल्लीतून निश्चित होते, असे महाजन यांनी माध्यमांना सांगितले. फक्त ते दिल्लीकडे काय शिफारस करणार? यावर विखे यांच्या भाजपा प्रवेशाचे भवितव्य अवलंबून आहे.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेBJPभाजपाGirish Mahajanगिरीश महाजन