विकासकामांचे श्रेय लाटण्याचा विरोधकांचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST2021-05-17T04:19:41+5:302021-05-17T04:19:41+5:30

अहमदनगर : महापालिकेत शिवसेनेची सत्ता नसली तरी नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात येत असून, विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी विकासकामांचे श्रेय ...

Opponents try to steal credit for development work | विकासकामांचे श्रेय लाटण्याचा विरोधकांचा प्रयत्न

विकासकामांचे श्रेय लाटण्याचा विरोधकांचा प्रयत्न

अहमदनगर : महापालिकेत शिवसेनेची सत्ता नसली तरी नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात येत असून, विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी विकासकामांचे श्रेय घेत आहेत, अशी टीका नगरसेवक अशोक बडे यांनी केली आहे.

माताजीनगर येथे जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. या वेळी नगरसेवक अशोक बडे, दत्ता सप्रे, भय्या साठे, संजय गायकवाड, किशोर माळवी, नितीन म्हस्के आदी नागरिक उपस्थित होते. बडे पुढे म्हणाले, की, सर्वप्रथम नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. नगरमध्ये महानगरपालिका आहे. परंतु, विकासकामांचे योग्य नियोजन होताना दिसत नाही. गेल्या वर्षापासूनची प्रलंबित कामे मार्गी लागत नाहीत. वेळोवेळी मोर्चे, आंदोलने केली. परंतु, प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. महापालिकेत सेनेची सत्ता नाही. सत्ता नसली तरी या भागातील नागरिकांना सुविधा पुरविण्याचे काम केले जात आहे.

Web Title: Opponents try to steal credit for development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.