ऑपरेशन मुस्कान यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST2021-01-04T04:18:17+5:302021-01-04T04:18:17+5:30

श्रीरामपूर : ऑपरेशन मुस्कानअंतर्गत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अपहरण झालेल्या चार बालकांचा तसेच हरवलेल्या ८५ व्यक्तींचा शोध घेण्यात यश ...

Operation Smile successful | ऑपरेशन मुस्कान यशस्वी

ऑपरेशन मुस्कान यशस्वी

श्रीरामपूर : ऑपरेशन मुस्कानअंतर्गत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अपहरण झालेल्या चार बालकांचा तसेच हरवलेल्या ८५ व्यक्तींचा शोध घेण्यात यश आले आहे. त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाल्याचा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

शहर पोलीस ठाण्यात दहा बालकांचे अपहण झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यातील चार बालकांना ताब्यात घेण्यात यश आले. याशिवाय ७८ महिला व ५९ पुरुष हरवल्याची नोंद होती. त्यातील ५२ महिला व २ पुरुषांचा पोलिसांनी छडा लावला. ऑपरेशन मुस्कान ही मोहीम १ डिसेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान राबविण्यात आली.

मोहीम यशस्वीतेसाठी जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आयुष नोपाणी, उपनिरीक्षक समाधान सुरवडे यांनी परिश्रम घेतले.

---------

Web Title: Operation Smile successful