सभापतींच्या सोडतीत खुल्या गटाला लॉटरी
By Admin | Updated: July 29, 2014 01:02 IST2014-07-28T23:35:58+5:302014-07-29T01:02:47+5:30
अहमदनगर: जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदासाठी सोमवारी काढलेल्या सोडतीत सहा पंचायत समित्यांचे सभापती पद सर्वसाधारण गटासाठी खुले झाले आहे़

सभापतींच्या सोडतीत खुल्या गटाला लॉटरी
अहमदनगर: जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदासाठी सोमवारी काढलेल्या सोडतीत सहा पंचायत समित्यांचे सभापती पद सर्वसाधारण गटासाठी खुले झाले आहे़ आगामी सभापतीपदाचे आरक्षण जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले असून, प्रशासनाने निश्चित केलेल्या आरक्षणानुसार सभापती निवडले जाणार आहेत़
जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली़ उपजिल्हाधिकारी डी़ एम़ बोरुडे, तहसीलदार राजेंद्र थोटे यावेळी उपस्थित होते़ सध्याचे सभापती पद व लोकसंखेच्या उतरत्या क्रमानुसार ही सोडत काढण्यात आली़ मागीलवर्षी ज्या पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे, त्या पंचायत समित्या वगळून इतरांसाठी सोडत काढण्यात आली़ या प्रवर्गासाठी टाकण्यात आलेली चिठ्ठी वरद राजेंद्र साळवे या विद्यार्थ्यांने काढली़ त्यामध्ये नेवासा पंचायत समिती सभापती पद अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव झाले़ तर कर्जत पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जाती प्रवर्गाच्या व्यक्तीसाठी राखीव करण्यात आले़ याच पध्दतीने अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठीची चिठ्ठी काढण्यात आली़ त्यामध्ये पाथर्डी पंचायत समितीचे सभापतीपद या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले़ त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या़ त्यामध्ये राहाता, नगर, श्रीरामपूर आणि जामखेडच्या चिठ्ठ्या निघाल्या़ या चार पंचायत समित्यांचे सभापतीपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाले़ उर्वरित सात पंचायत समित्यांचे सभापती पद सर्वसाधारण गटासाठी खुले झाले आहे़ त्यातून पुन्हा चार महिलांसाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या़ त्यानुसार चार पंचायत समित्यांचे सभापतीपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहे़ आगामी पंचायत समिती सभापतीपद वरील आरक्षणानुसार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)
असे आहे सभापतींचे आरक्षण...ं
नेवासा- अनुसूचित जाती- महिला, कर्जत- अनुसूचित जाती- व्यक्ती, पाथर्डी- अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी, राहाता- नागरिकांचा मागास प्रवर्ग- महिला, नगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग, श्रीरामपूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग- महिला, जामखेड- नागरिकांचा मागास प्रवर्ग, अकोले- सर्वसाधारण- महिला, कोपरगाव- सर्वसाधारण, शेवगाव- सर्वसाधारण- महिला, श्रीगोंदा- सर्वसाधारण- महिला, संगमनेर- सर्वसाधारण, राहुरी- सर्वसाधारण- महिला, पारनेर- सर्वसाधारण
सभापतीपदासाठी चक्रानुसार आरक्षण करण्यात येते़ मागील आरक्षण आणि लोकसंख्या विचारात घेऊन आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली असून, आगामी सभापती पदाच्या निवडी सदर आरक्षणानुसार करण्यात येतील़
- डी़ एम़ बोरुडे, उपजिल्हाधिकारी.