साईनगरीला आर्थिक संकटातून काढण्यासाठी साई मंदिर उघडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST2021-07-26T04:20:41+5:302021-07-26T04:20:41+5:30

जगताप म्हणाल्या, देशातील अन्य मोठ्या मंदिरांच्या धर्तीवर साई मंदिर भाविकांसाठी खुले करण्याची आवश्यकता आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या भाविकांना ...

Open Sai Temple to get Sainagar out of financial crisis | साईनगरीला आर्थिक संकटातून काढण्यासाठी साई मंदिर उघडा

साईनगरीला आर्थिक संकटातून काढण्यासाठी साई मंदिर उघडा

जगताप म्हणाल्या, देशातील अन्य मोठ्या मंदिरांच्या धर्तीवर साई मंदिर भाविकांसाठी खुले करण्याची आवश्यकता आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या भाविकांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणीद्वारे संख्या मर्यादित ठेवून व कोरोनाच्या नियमांचे पालन करून दर्शन देता येऊ शकेल. यामुळे अर्थकारण पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरू होईल. साई मंदिर उघडण्यासाठी भाविक विनवणी करत आहेत. गेल्या दीड वर्षापासून साई मंदिर बंद असल्याने शिर्डीच्या अर्थकारणाचा कणा मोडला आहे. साईभक्तांवर अवलंबून असलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट, हार-फूल, फोटो, मूर्ती दुकाने, रिक्षा, टुरिस्ट वाहन व्यवसाय व यावर उपजीविका असलेल्या हजारो कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. बँकाचे हप्तेही थकल्याने व्यावसायिकांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा देण्यात येत आहेत. यामुळे निराशा व भीतीचे वातावरण असून आर्थिक विवंचनेला कंटाळून अनेकांनी जीवनयात्रा संपवली आहे.

Web Title: Open Sai Temple to get Sainagar out of financial crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.