‘दार उघड उद्धवा, दार उघड’; शेवगावात भाजपची सरकारला हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:16 IST2020-08-29T16:15:38+5:302020-08-29T16:16:33+5:30
राज्यातील मंदिरे सुरू करावीत, या मागणीसाठी शेवगाव येथे भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. ‘दार उघड उद्धवा, दार उघड’, अशी हाक यावेळी देण्यात आली.

‘दार उघड उद्धवा, दार उघड’; शेवगावात भाजपची सरकारला हाक
शेवगाव : राज्यातील मंदिरे सुरू करावीत, या मागणीसाठी शेवगाव येथे भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. ‘दार उघड उद्धवा, दार उघड’, अशी हाक यावेळी देण्यात आली.
आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा देवी भावीनिमगाव, पावन गणपती मंदिर शेवगाव, बोधेश्वर मंदिर बोधेगाव आदी ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
भाजप तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे, रवींद्र सुरवसे, सचिन वारकड, आशा गरड, भीमराज सागडे, अशोक अहुजा, सुनील रसाने, वाय. डी. कोल्हे, कचरू चोथे, राजेंद्र डमाळे, उदय शिंदे, संदीप खरड, संदीप देशमुख, कासम शेख आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.