नगर-औरंगाबाद रस्त्यावरून पासधारकांनाच जिल्ह्यात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:22 IST2021-04-27T04:22:10+5:302021-04-27T04:22:10+5:30

नेवासा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या जिल्हाबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. ...

Only pass holders can enter the district from Nagar-Aurangabad road | नगर-औरंगाबाद रस्त्यावरून पासधारकांनाच जिल्ह्यात प्रवेश

नगर-औरंगाबाद रस्त्यावरून पासधारकांनाच जिल्ह्यात प्रवेश

नेवासा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या जिल्हाबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने नगर-औरंगाबाद महामार्गावरील प्रवरा संगम (ता.नेवासा) येथे चेकपोस्ट असून जिल्ह्याबाहेर जाणारा-येणारांची कसून चाैकशी केली जात असून पासधारकांनाच जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे.

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील जिल्ह्याची सीमा असलेल्या प्रवरा संगम येथे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. पासधारकांनाच नगर जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे.

नियम तोडून औरंगाबादच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना ‘नो एन्ट्री’ केली आहे. पास असणाऱ्या वाहनांना नगर जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. पासची व त्या वाहनांचीही पाहणी करून शहानिशा केली जात आहे.

नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच टोका, प्रवरा संगम या ठिकाणी नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन्ही जिल्ह्याच्या सीमा येतात. या ठिकाणी रात्रंदिवस पहारा देताना पोलिसांची अक्षरशः दमछाक होत आहे.

पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यासह त्यांचे सहकारी चेक नाक्यावर स्वतः थांबून लक्ष ठेवून आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईदेखील केली जात आहे. पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, प्रदीप शेवाळे, समाधान भाटेवाल या पोलीस अधिकाऱ्यांसमवेत पोलीस कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, कामगार तलाठी व आरोग्य कर्मचारी बंदोबस्त ठेवत आहेत.

---

२६ नेवासा चेकपोस्ट

प्रवरा संगम येथील चेकपोस्टवर येणाऱ्या-जाणाऱ्यांची चौकशी करताना पोलीस कर्मचारी.

Web Title: Only pass holders can enter the district from Nagar-Aurangabad road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.