विद्यार्थ्यांची अध्ययनात गोडी वाढविण्यासाठी ऑनलाइन गप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:15+5:302021-06-21T04:15:15+5:30

दहिगावने : लॉकडाऊनमुळे मागील दीड वर्षांपासून बंद असलेले प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन १५ जूनपासून सुरू झाले. नववी, दहावी आणि बारावीचे विद्यार्थी ...

Online chat to increase students' interest in learning | विद्यार्थ्यांची अध्ययनात गोडी वाढविण्यासाठी ऑनलाइन गप्पा

विद्यार्थ्यांची अध्ययनात गोडी वाढविण्यासाठी ऑनलाइन गप्पा

दहिगावने : लॉकडाऊनमुळे मागील दीड वर्षांपासून बंद असलेले प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन १५ जूनपासून सुरू झाले. नववी, दहावी आणि बारावीचे विद्यार्थी ऑनलाइन वर्गात हजर झाले. आम्ही सध्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना पक्क्या करण्यावर भर देत आहोत. प्रत्येक विषयाचे शिक्षक विद्यार्थ्यांची अध्ययनात गोडी वाढविण्यासाठी विषयासंदर्भात गप्पा मारत आहेत. विद्यार्थ्यांना मुक्तपणे व्यक्त होण्याची संधी दिली जात असल्याचे प्रतिपादन दहिगावने येथील नवजीवन विद्यालयाचे प्राचार्य अशोक उगलमुगले यांनी केले.

भावीनिमगाव (ता. शेवगाव) येथे पालकांनी आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवजीवन विद्यालयाच्या प्राचार्यपदाची सूत्रे मावळते प्राचार्य व्ही. एस. मरकड यांच्याकडून प्रा. उगलमुगले यांनी नुकतेच हाती घेतली. सध्या ते पालकांशी थेट संवाद साधत आहेत. यावेळी सरपंच आबासाहेब काळे, उपसरपंच संतोष चव्हाण, माजी सरपंच सदाशिव जाधव, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जोशी, प्रा. मकरंद बारगुजे, मछिंद्र पानकर, प्रा. संतोष आडकित्ते, सेवा संस्थेचे उपाध्यक्ष संजय शेळके, महादेव काळे, स्वाभिमानी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर, ग्रामपंचायत सदस्य बंडू तोरमड, नीलेश कुंभकर्ण, प्रवीण मरकड, विष्णू जाधव, झुंबर चव्हाण, संजय काळे, सुहास गायधने, विष्णू मुंजाळ, बाळासाहेब शिंदे, प्रा. नंदू शेळके, श्याम जाधव, एकनाथ जगधने आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

----

२० भावीनिमगाव येथे अशाेक उगलमुगले यांचा सन्मान करताना ग्रामस्थ.

Web Title: Online chat to increase students' interest in learning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.