भालगाव मराठी शाळेत गणपतीची ऑनलाइन आरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:22 IST2021-09-19T04:22:52+5:302021-09-19T04:22:52+5:30

भेंडा : भालगाव (ता. नेवासा) या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने कोरोना काळात राबविलेला घरोघरी शाळा या उपक्रमाचे जिल्हाभरात कौतुक ...

Online Aarti of Ganpati at Bhalgaon Marathi School | भालगाव मराठी शाळेत गणपतीची ऑनलाइन आरती

भालगाव मराठी शाळेत गणपतीची ऑनलाइन आरती

भेंडा : भालगाव (ता. नेवासा) या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने कोरोना काळात राबविलेला घरोघरी शाळा या उपक्रमाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे. गणेशोत्सव काळात मुलांना गणेशाचे महत्त्व समजण्यासाठी पूजा-आरती कशा प्रकारे केली जाते. याचे ज्ञान मुलांना मिळावे यासाठी उपक्रमशील शिक्षिका सुनीता निकम यांनी ऑनलाइन श्री गणेशा आरती हा उपक्रम इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी राबविला.

कोरोना काळात आपण एकमेकांच्या घरी जाऊ शकत नाही. एकमेकांचे गणपती पाहू शकत नाही. त्यांची सजावट पाहण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमात रोज एका विद्यार्थ्याच्या घरातील आरती संध्याकाळी ७.४५ वा. सुरू होते. आरतीला रोज अधिकारी, पदाधिकारी, विद्यार्थी, पालकही हजेरी लावतात. गुरुवारी इयत्ता पहिलीचा विद्यार्थी साई विलास नळघे याच्या घरातील आरतीला आमदार नीलेश लंके, नेवासा पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, विस्तार अधिकारी विद्यादेवी सुंबे, जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे, शरद कोतकर, केंद्रप्रमुख प्रवीण सोनवणे, संतोष ढोले, सुषमा जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

180921\img-20210917-wa0156.jpg

गणपती आरती फोटो

Web Title: Online Aarti of Ganpati at Bhalgaon Marathi School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.