कांदा चाळीत भरण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:21 IST2021-04-27T04:21:59+5:302021-04-27T04:21:59+5:30
गेले वर्षभर कांद्याला चांगला भाव होता. दिवाळीमध्ये कांद्याचे भाव विक्रमी दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. भाव चांगला असल्याने आणि ...

कांदा चाळीत भरण्याच्या हालचाली
गेले वर्षभर कांद्याला चांगला भाव होता. दिवाळीमध्ये कांद्याचे भाव विक्रमी दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. भाव चांगला असल्याने आणि पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली. अगदी जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत कांद्याला चांगला भाव होता; परंतु त्यानंतर कोरोना संसर्गात मोठी वाढ झाली. अनेक ठिकाणी लॉकडाऊनमुळे बाजार बंद राहिले, तसेच हॉटेल व्यवसायही बंद असल्याने कांद्याची मागणी कमी झाली. त्यामुळे कांद्याचे भाव पडले. नगर बाजार समितीत १५ एप्रिल रोजी अखेरचा लिलाव झाला होता. त्याला कांद्याला आठशे ते हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे दर खूप कमी आहेत. कांद्याला किमान वीस रुपयांच्या पुढे भाव मिळायला हवा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, सध्या अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा लिलाव बंद आहेत. शिवाय भाव नसल्याने शेतकऱ्यांनी आता चाळी दुरुस्त करून किंवा नवीन चाळी तयार करून कांदा चाळीत ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक ठिकाणी सध्या कांद्याची काढणी सुरू आहे. त्यामुळे काढलेला कांदा सध्या तरी शेतातच वाळण्यास ठेवला आहे.