कांद्याचे भाव घसरले

By | Updated: December 6, 2020 04:21 IST2020-12-06T04:21:27+5:302020-12-06T04:21:27+5:30

अहमदनगर : गेल्या तीन महिन्यांपासून तेजीत असणारा कांदा आता हळूहळू उतरू लागला आहे. शनिवारी (दि.५) झालेल्या कांदा लिलावात नगर ...

Onion prices fell | कांद्याचे भाव घसरले

कांद्याचे भाव घसरले

अहमदनगर : गेल्या तीन महिन्यांपासून तेजीत असणारा कांदा आता हळूहळू उतरू लागला आहे. शनिवारी (दि.५) झालेल्या कांदा लिलावात नगर बाजार समितीत गावरान कांद्याला दोन हजार, तर लाल कांद्याला तीन हजार रुपयांपर्यंत भाव निघाला.

यंदा उन्हाळी कांदा शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात होता; परंतु पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याची नासाडी झाली. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी लाल कांद्याची लागवड केली त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी, आवक कमी झाल्याने कांद्याचे भाव वाढले. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कांदा तब्बल दहा हजारांपर्यंत गेला होता. नोव्हेंबरमध्ये पाऊस थांबल्यानंतर हळूहळू कांदा बाजारात येऊ लागला. दरम्यानच्या काळात शासनाने इजिप्तवरूनही कांद्याची आयात केली. त्यामुळे एकदम वर गेलेले कांद्याचे दर हळूहळू कमी झाले. मागील पंधरा दिवसांपासून बाजारात लाल कांद्याची आवक होत असल्याने गावरान कांद्यालाही कमी भाव मिळू लागला. एवढेच नव्हे तर पहिल्यांदाच गावरानपेक्षा लाल कांद्याला भाव अधिक मिळाला.

शनिवारी झालेल्या लिलावात नगर बाजार समितीत १२ हजार ७९७ क्विंटल गावरान कांद्याची आवक होऊन प्रथम प्रतवारीच्या कांद्याला २००० ते २४०० रुपयांचा भाव मिळाला. याशिवाय ९ हजार ६३२ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्याला अडीच ते तीन हजार रुपयांचा भाव मिळाला. गेल्या तीन महिन्यांपासून तेजीत असणारा कांदा आता हळूहळू कमी होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे सध्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड केली आहे. हा कांदा जेव्हा बाजारात येईल त्यावेळीही कांद्याच्या बाजारभावावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

---------------

शनिवारच्या लिलावातील भाव

(गावरान)

प्रथम प्रतवारी २००० ते २४००

द्वितीय १५०० ते २०००

तृतीय ७०० ते १५००

चतुर्थ १०० ते ७००

---------------

(लाल कांदा)

प्रथम प्रतवारी २५०० ते ३०००

द्वितीय १७०० ते २५००

तृतीय ९०० ते १७००

चतुर्थ ५०० ते ९००

---------------

Web Title: Onion prices fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.