कांदा लिलाव बंद पाडले
By Admin | Updated: March 26, 2024 18:35 IST2014-05-18T23:28:30+5:302024-03-26T18:35:16+5:30
अकोले : व्यापार्यांच्या मनमानीला कंटाळून कृषी उत्पन्न बाजार समितीत संतप्त कांदा उत्पादक शेतकर्यांनी कांदा लिलाव बंद पाडले.

कांदा लिलाव बंद पाडले
अकोले : व्यापार्यांच्या मनमानीला कंटाळून कृषी उत्पन्न बाजार समितीत संतप्त कांदा उत्पादक शेतकर्यांनी कांदा लिलाव बंद पाडले. रविवारी सायंकाळी सहा वाजता झालेल्या या गोंधळामुळे बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. संतप्त शेतकर्यांनी आवारासमोर ठिय्या देत निषेधाच्या घोषणा दिल्या. तर विक्रीसाठी आणलेला कांदा पावसामुळे भिजल्याने एका वृध्द शेतकर्याने फेट्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला माञ इतर शेतकर्यांनी व आंदोलकांनी त्याची समजूत काठल्याने अनर्थ टळला. आंदोलकांची आक्रमक भूमिका पाहून भिजलेल्या कांद्याची बाजार समिती जबाबदारी घेईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगत सोमवारी सकाळी उरलेल्या कांद्याचा लिलाव करण्याचे ठरले. भिजलेल्या कांद्याची हमी बाजार समितीने घ्यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली. बाजार समितीचे उपाध्यक्ष उपस्थित होते. अध्यक्ष माञ आंदोलकांसमोर आले नाहीत. बाजार समितीत निवडणूका होणार असल्याने सध्या कुणाचे लक्ष नसल्याचे शेतकरी बोलत होते. दुसर्या दिवशी राहिलेले लिलाव करण्याचे ठरले. आंदोलनाचे नेतृत्व माकप किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केले. शंकरराव वाळुंज, सदाशिव घोडसरे, सुरेश भोर, लक्ष्मण नेहे, ज्ञानेश्वर आरोटे आदींसह मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी होते. (तालुका प्रतिनिधी) व्यापार्यांच्या तक्रारी बाजार समितीत कांदा खरेदी करणारे व्यापारी मनमानी करतात, दिवसा लिलाव करत नाही, राञी उशीरा लिलाव होतो. सर्व व्यापारी वेळेत येत नाही. लॉबी करुन शेतकर्यांचा माल कमी भावाने घेतला जातो असा आरोप करत संतप्त शेतकर्यांनी लिलाव बंद पाडले. उशिराने आलेल्या व्यापार्याच्या गाडीला घेराव घालत समिती प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.