नेप्ती उपबाजारात कांदा लिलाव पूर्ववत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:26 IST2021-09-04T04:26:15+5:302021-09-04T04:26:15+5:30

वाराई, हमालीवरून नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात वाहतूक संघटना व व्यापारी संघटना यांच्यात वाद सुरू झाला. ‘त्याचा माल त्याचा ...

Onion auction resumes in Nepti sub-market | नेप्ती उपबाजारात कांदा लिलाव पूर्ववत सुरू

नेप्ती उपबाजारात कांदा लिलाव पूर्ववत सुरू

वाराई, हमालीवरून नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात वाहतूक संघटना व व्यापारी संघटना यांच्यात वाद सुरू झाला. ‘त्याचा माल त्याचा हमाल’ असा निर्णय घेतल्याने वेळेत कांदा लिलाव होऊ शकले नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना दिवसभर यासाठी ताटकळत बसावे लागले. यानंतर कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेने घेतला. शुक्रवारी यावर नगर बाजार समितीच्या सभागृहात वाराई, हमालीबाबत व्यापारी संघटना व वाहतूक संघटना, बाजार समितीचे संचालक यांच्यात संयुक्त बैठक झाली. यात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनीही सहभाग घेतला.

यावेळी बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर शिकरे, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बाबा सानप, बाजार समितीचे सचिव अभय भिसे उपस्थित होते.

यात वाराई, हमालीवर चर्चा झाली. या बैठकीमध्ये ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्य पातळीवरील बैठकीत जो निर्णय होईल, त्यानंतर पुन्हा नगरमध्ये बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत जुन्या प्रचलित पध्दतीने काम सुरू ठेवण्यात यावे, असा तोडगा कर्डिले यांच्या मध्यस्थीने काढण्यात आला. त्यास सर्वांनी संमती दिली. यामुळे शनिवारी कांदा लिलाव सुरू राहणार असल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली. तसेच शनिवारी शेतकऱ्यांनी कांदा घेऊन येण्याचे आवाहनही बाजार समितीने केले आहे.

Web Title: Onion auction resumes in Nepti sub-market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.