एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तींचे जीवन प्रकाशमय बनते;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:25 IST2021-08-28T04:25:07+5:302021-08-28T04:25:07+5:30
जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभाग व फिनिक्स सोशल फाैंडेशनच्या पुढाकाराने शुक्रवारी आयोजित २६ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याच्या शुभारंभप्रसंगी डॉ. पोखरणा ...

एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तींचे जीवन प्रकाशमय बनते;
जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभाग व फिनिक्स सोशल फाैंडेशनच्या पुढाकाराने शुक्रवारी आयोजित २६ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याच्या शुभारंभप्रसंगी डॉ. पोखरणा बोलत होते. यावेळी फिनिक्स फाैंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष जालिंदर बोरुडे, डॉ. संतोष रासकर, डॉ. अजिता गरुड, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज घुगे, नेत्रचिकित्सा अधिकारी अशोक गायकवाड, नेत्रदान समुपदेशक सतीश अहिरे आदी उपस्थित होते.
डॉ. पोखरणा म्हणाले, कोरोनाच्या भीतीने माणूस माणसापासून दुरावत असताना, फिनिक्स सोशल फाैंडेशनचे नेत्रदान चळवळीतील कार्य प्रेरणादायी आहे. अनेकांचे नेत्रदान घडवून हजारो दृष्टिहीनांना नवदृष्टी देण्याची महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली.
बोरुडे यांनी, फिनिक्स फाैंडेशनच्या माध्यमातून आयोजित शिबिराची माहिती दिली. नेत्रतज्ज्ञ डॉ. संतोष रासकर व डॉ. अजिता गरुड यांनी मरणोत्तर नेत्रदानाची माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संभाजी भोस यांचे नेत्रदानाचे संकल्पपत्र भरून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
........................
फोटो २६ नेत्रदान
ओळी-
जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिकांचे नेत्रदान संकल्पपत्र भरून करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, समवेत जालिंदर बोरुडे, नेत्रतज्ज्ञ डॉ. संतोष रासकर, डॉ. अजिता गरुड, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज घुगे, नेत्रचिकित्सा अधिकारी अशोक गायकवाड, नेत्रदान समुपदेशक सतीश अहिरे आदी.