दारुड्यांकड़ून महिलेसह एकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:45 IST2020-12-17T04:45:25+5:302020-12-17T04:45:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : घराजवळ पायी जात असलेल्या महिलेसह एकास दारुड्याने विनाकारण शिवीगाळ करून डोक्यात दगड मारून जखमी ...

One man and a woman beaten by drunkards | दारुड्यांकड़ून महिलेसह एकाला मारहाण

दारुड्यांकड़ून महिलेसह एकाला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : घराजवळ पायी जात असलेल्या महिलेसह एकास दारुड्याने विनाकारण शिवीगाळ करून डोक्यात दगड मारून जखमी केले. घराजवळच असलेल्या दुचाकीचे दगड मारून नुकसान केले. महिलेच्या घरासमोरील पाण्याचा नळदेखील तोडून टाकत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.

ही घटना कोपरगाव शहरातील दत्तनगर येथे मंगळवारी (दि.१५) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या मारहाणीत सतनाम सिंग (रा. दत्तनगर, कोपरगाव) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मनज्योतसिंग अमरजितसिंग भाटिया (रा. दत्तनगर, कोपरगाव) यांच्या फिर्यादीवरून संदीप शिरसाठ, रवी कुंदे, अमित लकारे, स्वप्नील मंजूळ, पप्पू शेंडगे, रोहम कदम ( सर्व रा. दत्तनगर, कोपरगाव) यांच्या विरुद्ध बुधवारी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी. एस. कोरेकर करीत आहेत.

Web Title: One man and a woman beaten by drunkards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.