हिरडगाव चौफुला येथे दुचाकींच्या धडकेत एकजण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 19:35 IST2018-04-05T19:35:21+5:302018-04-05T19:35:39+5:30
दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. हिरडगाव चौफुला (ता.श्रीगोंदा) येथे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला.

हिरडगाव चौफुला येथे दुचाकींच्या धडकेत एकजण ठार
श्रीगोंदा : दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. हिरडगाव चौफुला (ता.श्रीगोंदा) येथे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला.
मृतामध्ये राजेश जगताप (वय २७, रा. कुळधरण, ता.कर्जत) यांचा तर जखमीमध्ये गणेश मेहेत्रे (वय २४, रा, राक्षसवाडी, ता. कर्जत) यांचा समावेश आहे. जखमी मेहेत्रेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले.
दोन्ही दुचाकीस्वार वेगात असल्याने वळणाचा अंदाज न आल्याने दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींचा पुढील भाग बाजूला तुटून पडला. मयत जगताप यांचा कुळधरण येथे फोटोग्राफीचा व्यवसाय होता.
गणेश मेहेत्रे यांच्या डोक्यात हेल्मेट होते. अपघातानंतर हेल्मेट बाजूला पडले, मात्र त्यांच्या डोक्याला अधिक इजा झाली नाही.