चंदनापुरी घाटातील अपघातात एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:16 IST2020-12-26T04:16:49+5:302020-12-26T04:16:49+5:30

राजाराम नारायण म्हात्रे (वय ५७) असे अपघातातील मयत कारचालकाचे नाव आहे. तर शनिवार रामा म्हात्रे (वय ५५) व नाथा ...

One killed, two injured in Chandanapuri Ghat accident | चंदनापुरी घाटातील अपघातात एक ठार, दोन जखमी

चंदनापुरी घाटातील अपघातात एक ठार, दोन जखमी

राजाराम नारायण म्हात्रे (वय ५७) असे अपघातातील मयत कारचालकाचे नाव आहे. तर शनिवार रामा म्हात्रे (वय ५५) व नाथा बापू म्हात्रे (वय ५०) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व जण (बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे) येथील रहिवासी आहेत. हे तिघे जण हे कारमधून (एम. एम. ०५, डी. एक्स. ६३६४) नाशिकच्या दिशेने जात असताना चंदनापुरी घाटात उतारावर इनोव्हा कारची पुढे असलेल्या आयशर टेम्पोला (एम. एच. १५, एफ. व्ही. ०९५१) पाठीमागून जोराची धडक बसली. या अपघाताची माहिती मिळताच डोळासणे येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे हे पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत तात्काळ अपघातस्थळी पोहाेचले. जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढत रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यातील राजाराम म्हात्रे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर जखमी शनिवार म्हात्रे व नाथा म्हात्रे यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

२५ अपघात

Web Title: One killed, two injured in Chandanapuri Ghat accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.