वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 18:16 IST2017-08-16T18:16:28+5:302017-08-16T18:16:28+5:30
शिबलापूर-राहुरी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने रमेश कारभार वाघमारे (वय २८, रा. खळी पिंप्री,ता.संगमनेर) या मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला.

वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
आ ्वी : शिबलापूर-राहुरी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने रमेश कारभार वाघमारे (वय २८, रा. खळी पिंप्री,ता.संगमनेर) या मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला.बजाज प्लॅटिना (क्रमांक एम. एच. १७ यु ८१३०) मोटारसायकलवर खांबा (ता. संगमनेर) येथे बहिणीला सासरी सोडून ते घरी येत होते. शिबलापूर राहुरी रस्त्यावरील पिंप्री फाट्याजवळ मंगळवारी सायंकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात रमेश यांच्या हाता पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्यामागे आई, वडील, पत्नी,एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. आश्वी पोलिसांनी बुधवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.