श्रीरामपूरमध्ये अपघातात मोटारसायकलस्वार एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 17:34 IST2018-05-29T17:33:09+5:302018-05-29T17:34:26+5:30
तालुक्यातील वडाळा महादेव येथे सोमवारी रात्री झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. अपघातात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

श्रीरामपूरमध्ये अपघातात मोटारसायकलस्वार एक ठार, एक जखमी
श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळा महादेव येथे सोमवारी रात्री झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. अपघातात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मयताचे नाव ज्ञानेश्वर चौघुले (रा. पिचडगाव, ता. नेवासा) असे आहे. जखमी रामदास निकम याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. वडाळा येथील अजित पवार पॉलिटेक्निक कोलेजसमोर रात्री ९ वाजता हा अपघात झाला. हे दोघे श्रीरामपूरहून नेवासेकडे चालले होते. अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे कर्मचा-्यांसह घटनास्थळी दाखल झाले.