श्रीरामपूरात भीषण अपघातात एक ठार, व्यापारी गंभीर जखमी; अपघातांची मालिका सुरूच

By शिवाजी पवार | Updated: June 27, 2023 12:07 IST2023-06-27T12:07:31+5:302023-06-27T12:07:49+5:30

सोमवारी दुपारी ही घटना घडली. अपघातात दोन्ही दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

One killed, businessman seriously injured in horrific accident in Srirampur; The series of accidents continues | श्रीरामपूरात भीषण अपघातात एक ठार, व्यापारी गंभीर जखमी; अपघातांची मालिका सुरूच

श्रीरामपूरात भीषण अपघातात एक ठार, व्यापारी गंभीर जखमी; अपघातांची मालिका सुरूच

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर नेवास मार्गावर रेल्वे उड्डाणपुलाजवळ दोन मोटारसायकलच्या झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार  झाला. श्रीरामपूर येथील व्यापारी गंभीर जखमी झाला आहे.

सोमवारी दुपारी ही घटना घडली. अपघातात दोन्ही दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. बाजार समितीत नोकरीस असलेला मनोज नानासाहेब उंडे (वय २३ रा.मातापूर ) हा तरुण ठार झाला. व्यावसायिक पारस कल्याणमल पाटणी (वय ५२) हे व्यापारी गंभीर झाले. त्यांना तातडीने नगर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

अशोकनगरहून श्रीरामपूरच्या दिशेने येणाऱ्या मनोज याच्या दुचाकीने समोरून येणाऱ्या पाटणी यांच्या दुचाकीशी जोराची धडक दिली. अपघातस्थळी मोठा जमाव जमला. जमावाने पाटणी यांना तातडीची मदत केली. दरम्यान, या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू आहे. नव्याने झालेल्या रस्त्यामुळे वाहने सुसाट धावत आहेत. परिसरातील गावांनी बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनानंतर ठिकठिकाणी गतिरोधक बसवण्यात आले आहे.
 

Web Title: One killed, businessman seriously injured in horrific accident in Srirampur; The series of accidents continues

टॅग्स :Accidentअपघात