पुणे मार्गावरील अपघातात एक ठार
By Admin | Updated: August 26, 2014 23:21 IST2014-08-26T23:07:18+5:302014-08-26T23:21:33+5:30
पारनेर : नगर-पुणे महामार्गावर नारायणगव्हाणजवळील धोकेदायक वळणावर दोन टेम्पोच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार, तर सहा जण जखमी झाले आहेत.

पुणे मार्गावरील अपघातात एक ठार
पारनेर : नगर-पुणे महामार्गावर नारायणगव्हाणजवळील धोकेदायक वळणावर दोन टेम्पोच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार, तर सहा जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. या अपघातात आनंदराव मारूती वाव्हळ (रा.सारोळा कासार, ता. नगर) हे गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
सुपा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,मंगळवारी सकाळी टेम्पो (एम. एच.१६अे.टी.३८०७) हा नगरकडून पुण्याकडे जात असताना समोरून येणारा दुसरा टेम्पो (क्रमांक एम.एच.१६अे.टी.६४३०) यांच्यामध्ये धडक झाली. या अपघातात टेम्पोतील शोभा बलभीम येळकर, रामभाऊ गणपत काळे, काशिनाथ ज्ञानदेव धामणे, अरूण आनंदा ढोरजकर, गंगुबाई रभाजी धामणे, लक्ष्मीबाई निवृत्ती धामणे (सर्व रा. सारोळा कासार, ता.नगर) हे जखमी झाले. त्यांच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व जखमींना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामधील काशिनाथ धामणे, आंबई दादाभाऊ काळे, रामदास गणपत काळे या तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान या अपघात प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)