जिल्ह्यात ३८० गावांत एक गाव एक गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:25 IST2021-09-12T04:25:11+5:302021-09-12T04:25:11+5:30

यंदा जिल्ह्यात एकूण १ हजार ५५३ गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. चैतन्य, उत्साह आणि सामाजिक एकरूपतेचे प्रतीक असलेल्या ...

One Ganpati in 380 villages in the district | जिल्ह्यात ३८० गावांत एक गाव एक गणपती

जिल्ह्यात ३८० गावांत एक गाव एक गणपती

यंदा जिल्ह्यात एकूण १ हजार ५५३ गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. चैतन्य, उत्साह आणि सामाजिक एकरूपतेचे प्रतीक असलेल्या गणेश उत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गणेश मंडळे साधेपणानेच उत्सव साजरा करत आहेत.

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात ३ हजार १२२ मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली होती. यंदा ही ही संख्या निम्म्यानी घटली आहे. गावांमध्ये एकता रहावी, वाद उद्भवू नयेत, सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करावा, यासाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना पुढे आली आहे. यासाठी पोलीस दलाकडून ग्रामस्थांच्या बैठका घेऊन त्यांचे प्रबोधन केले जाते.

-------------------------

उपक्रमात यंदाही राजूर, अकोले पुढे

जिल्ह्यात दरवर्षी अकोले व राजूर पोलीस ठाणे हद्दीतील सर्वाधिक गावांत एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविला जातो. यंदाही राजू ठाणे हद्दीत ७८ तर अकोले ठाणे हद्दीत ९४ गावांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.

---------------------

..टळतात वाद

गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस दलावर मोठा ताण असतो. एका गावात अनेक मंडळांचा गणेशोत्सव असतो, तेव्हा आपलेच मंडळ कसे भारी हे दाखविण्यासाठी स्पर्धा सुरू होते. यातून वाद होण्याचे प्रसंग उद्भवतात. अशा परिस्थितीत एक गाव एक गणपती ही संकल्पना एकात्मतेचे प्रतीक ठरत आहे.

----------------------

पोलीस ठाणेनिहाय ‘एक गाव एक गणपती’

अकोले-९४

राजूर-७८

भिंगार-१पारनेर-२०

नगर ता-२१

सुपा-१७

कर्जत-१

श्रीगोंदा-५

बेलवंडी-१५

जामखेड-५

एमआयडीसी-१

शेवगाव-५

पाथर्डी-५

नेवासा-७

शनिशिंगणापूर-२

राहाता-५

लोणी-२३

कोपरगाव ता-४

कोपरगाव शहर-३

श्रीरामपूर शहर-२१

श्रीरामपूर ता.१२

संगमनेर शहर-८

संगमनेर ता-८

घारगाव-१६

आश्वी-१

---------------------------

सार्वजनिक गणेश मंडळे

११०४

खासगी मंडळे-

६९

एक गाव एक गणपती

३८०

एकूण

१५५३

Web Title: One Ganpati in 380 villages in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.