जेऊर येथे एकास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST2021-05-07T04:21:49+5:302021-05-07T04:21:49+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील सचिन बाळासाहेब वाघमारे यास दोघांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात ...

जेऊर येथे एकास बेदम मारहाण
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील सचिन बाळासाहेब वाघमारे यास दोघांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात सचिन वाघमारे याचा भाऊ सुनील वाघमारे याने दिलेल्या फिर्यादीवरून सचिन विष्णू ससे (रा. ससेवाडी, ता. नगर) व आदिनाथ म्हस्के (रा. चाफेवाडी) यांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी (दि.५) आरोपी यांनी राहत्या घरी येऊन काहीच कारण नसताना जातिवाचक शिवीगाळ करून आदिनाथ म्हस्के याने लोखंडी गजाने डोक्यात मारले, तर सचिन ससे याने दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. यातील आरोपी सचिन ससेला अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.