‘मुळा’त अवघा दीड टीएमसी जीवंत साठा
By Admin | Updated: June 3, 2014 00:27 IST2014-06-02T23:34:47+5:302014-06-03T00:27:08+5:30
राहुरी : दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, आता केवळ १ हजार ६९१ दलघफू जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे.
‘मुळा’त अवघा दीड टीएमसी जीवंत साठा
राहुरी : दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, आता केवळ १ हजार ६९१ दलघफू जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून सध्या १३२५ क्युसेकने शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे़ सध्या धरणात ६ हजार १८१ दलघफू पाणीसाठा असून, त्यातील ४५०० दलघफू मृतसाठा आहे. उजवा कालवा सुरू असल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत आहे. उजव्या कालव्याखालील पाण्याची मागणी सुरूच आहे़त्यामुळे आणखी किती पाणी लागेल व कालवा किती दिवस चालेल याबाबत पाठबंधारे खातेही रामभरोस आहे़ कालवा बंद होण्याच्या अगोदर तीन तास पाटबंधारे खात्याला शेतीचे भरणे पूर्ण झाल्याचे कळणार आहे़ टेल भागात अजूनही पाण्याची मागणी कायम आहे़ पावसाळा लांबल्याने शेतकर्यांपुढे पेरणी करण्याचे आव्हान आहे़ मुळा धरणाचा डावा कालवा दहा दिवसांपूर्वीच बंद झाला आहे़ डाव्या कालव्यातून ७०० दलघफू पाण्याचा वापर झाला आहे़ पावसाने प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने श्ोतकरी दुहेरी पध्दतीने पिकाचे भरणे करीत आहेत़ उन्हाचा पारा ४२ अंशावर गेल्याने पाण्याची असलेली जमिनीची भूक वाढत आहे़ मुळा धरणात पिण्यासाठी व उद्योगासाठी जुलैअखेर पुरेल इतका पाण्याचा साठा शिल्लक आहे़ शिवाय राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाला वाटेल तेवढे पाणी धरणातून संशोधनासाठी मिळणार आहे़ मुळा डावा कालव्याखाली असलेल्या मुसळवाडी तलावात पाणी सोडण्यास पाटबंधारे खात्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही़ (तालुका प्रतिनिधी)