प्रवासावेळी एसटीतच एका वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:19 IST2021-02-07T04:19:02+5:302021-02-07T04:19:02+5:30

जामखेड : एका वृद्ध व्यक्तीचा प्रवासादरम्यान एसटी बसमध्येच मृत्यू झाला. ही घटना जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे शनिवारी सकाळी उघड ...

An old man died in ST while traveling | प्रवासावेळी एसटीतच एका वृद्धाचा मृत्यू

प्रवासावेळी एसटीतच एका वृद्धाचा मृत्यू

जामखेड : एका वृद्ध व्यक्तीचा प्रवासादरम्यान एसटी बसमध्येच मृत्यू झाला. ही घटना जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे शनिवारी सकाळी उघड झाली.

बारामतीहून जामखेडमार्गे भूमकडे जाणारी बस (एमएच १४ बी. टी. १५७७) शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास खडकत (ता. आष्टी) येथे आली. तेथून एक वृद्ध व्यक्ती बसमध्ये चढली. ती व्यक्ती जामखेड तालुक्यातील पाटोदा (गरड) येथे उतरणार होती. पाटोदा आल्यानंतर एसटीच्या वाहकाने त्या व्यक्तीला उतरण्यासाठी आवाज दिला. मात्र त्या व्यक्तीकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने वाहक तो वृद्ध बसलेल्या सीटजवळ गेला. तेथे वृद्धाच्या तोंडाला फेस आल्याचे दिसून आले. बसचालक राजाराम नागरगोजे आणि वाहक चैतन्य फटाले यांनी पाटोदा येथील सरपंचांना बोलवून घेतले. व्यक्तीस ओळखता का असे विचारले तर त्यांनी हा आमच्या गावचा माणूस नाही, असे सांगितले. त्यामुळे चालक-वाहकाने बस जामखेड पोलीस ठाण्यात नेली. त्यानंतर त्या व्यक्तीला जामखेड ग्रामीण रूग्णालयात नेले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी त्यास मृत घोषित केले. त्या मृत व्यक्तीचे नाव महादेव नामा शिंदे असून तो आष्टी तालुक्यातील खडकत येथील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.

Web Title: An old man died in ST while traveling