९० वर्षाच्या वृद्धाने दिला अनेकांना काठीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 18:05 IST2017-09-11T18:05:27+5:302017-09-11T18:05:37+5:30
खासेराव साबळे पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील ज्येष्ठ नागरिक देवराम लक्ष्मण गुंड यांनी वयाच्या नव्वदीमध्ये गावातील ...

९० वर्षाच्या वृद्धाने दिला अनेकांना काठीचा आधार
खासेराव साबळे
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील ज्येष्ठ नागरिक देवराम लक्ष्मण गुंड यांनी वयाच्या नव्वदीमध्ये गावातील १०० ते १५० वृद्ध व अपंगांना स्वत: काठ्या तयार करून मोफत वाटप केले आहे. या बदल्यात ते गरजू व्यक्तींकडून चहा देखील घेत नाहीत.
देवराम गुंड ९० वर्षांचे असून, या वयात हातात कु-हाड घेऊन गोंधन झाडाच्या फांद्या तोडून त्यावर ते स्वत: प्रक्रिया करतात. काठीला असलेला वाक काढून त्या काठ्या भाजून त्यावर प्रक्रिया करतात. गोंधन या झाडाची काठी टिकाऊ व वजनाला हलकी असल्यामुळे वृद्ध व्यक्तीला वापरण्यास सोपी जाते. अशा पद्धतीने देवराम गुंड यांनी गावातील गरजू १५० व्यक्तींना मोफत काठ्या वाटप केल्या आहेत. ही गोष्ट ते एक आवड म्हणून करतात. या वयात त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे.
---
काठी तयार करण्यामुळे या वयात देखील मी तंदुरुस्त राहू शकलो व दुस-यांना आधार दिल्याचा एक वेगळा आनंद मिळतो.
-देवराम गुंड
---
देवराम गुंड यांनी दिलेली काठी मी मागील पाच वर्षांपासून वापरतो. मला फार उपयुक्त ठरली आहे. त्या बदल्यात त्यांनी चहा देखील घेतला नाही.
-जनार्दन शिंदे