जुन्या भांडणातून शिर्डीत तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 11:26 IST2019-04-24T11:25:00+5:302019-04-24T11:26:27+5:30

शिर्डीतील मंगेश पाईक ह्या युवकाची काल मध्यरात्री हत्या करण्यात आली आहे.

The old killed the young man in Shirdi | जुन्या भांडणातून शिर्डीत तरुणाची हत्या

जुन्या भांडणातून शिर्डीत तरुणाची हत्या

शिर्डी: शिर्डीतील मंगेश पाईक ह्या युवकाची काल मध्यरात्री हत्या करण्यात आली आहे. जुन्या भांडणातून नऊ-दहा जणांनी मंगेशची हत्या केल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले. काल, मंगळवारी रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान ही हत्या झालेली आहे. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत रात्री जवळपास सर्व नऊ आरोपींना रात्रीच ताब्यात घेतले असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले. उपअधीक्षक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड अधिक तपास करत आहेत.

Web Title: The old killed the young man in Shirdi