साईबाबांना १५ लाखांचा सुवर्णमंडित शंख अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 14:02 IST2019-12-31T14:02:22+5:302019-12-31T14:02:34+5:30

शिर्डी : साईबाबांना आज दिल्लीतील एका भाविकाने सुवर्णमंडित शंख अर्पण केला आहे. या शंखाची किंमत जवळपास पंधरा लक्ष रुपये आहे.

Offer gold lacquer shells of 3 lakhs to Saibabaसाईबाबांना १५ लाखांचा सुवर्णमंडित शंख अर्पण | साईबाबांना १५ लाखांचा सुवर्णमंडित शंख अर्पण

साईबाबांना १५ लाखांचा सुवर्णमंडित शंख अर्पण

शिर्डी : साईबाबांना आज दिल्लीतील एका भाविकाने सुवर्णमंडित शंख अर्पण केला आहे. या शंखाची किंमत जवळपास पंधरा लक्ष रुपये आहे.
रक्षी शर्मा, दिल्ली असे या भाविकांचे नाव आहे. साईबाबा संस्थानकडील एका पांढºयाया शुभ्र शंखाला साडेबारा लक्ष रुपये किमतीचे तीस तोळ्याचे सुवर्ण नक्षीकाम करण्यात आले आहे. मजुरीसह या शंखाची किंमत पंधरा लक्ष रुपये आहे. रोज काकड आरतीला शंखातून साई मूर्ती व समाधीला जलधारेने स्नान घालण्यात येते. यापुढे शंख वापरण्यात येणार आहे. दुपारच्या मध्यान्ह आरतीपूर्वी शर्मा कुटुंबाने हा सुवर्णमंडीत शंख संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मंदीर प्रमुख रमेश चौधरी, राजेंद्र जगताप आदींची उपस्थिती होती, शर्मा कुटुंबाने यापूर्वी शताब्दी वर्षात दहा लक्ष रुपये किमतीचा सोन्याचा डबा साईना अर्पण केला होता.

Web Title: Offer gold lacquer shells of 3 lakhs to Saibabaसाईबाबांना १५ लाखांचा सुवर्णमंडित शंख अर्पण