जिल्हा परिषदेचे सभापती फटांगरेंविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 18:15 IST2017-09-12T18:15:12+5:302017-09-12T18:15:54+5:30
संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे सभापती फटांगरेंविरूद्ध गुन्हा
ठळक मुद्देबळजबरीने टोल वसुली हिवरगाव पावसा नाक्यावरील घटना
संगमनेर : नाशिक-पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा शिवारात असलेल्या टोल नाक्यावर शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास स्थानिक वाहनधारकांना टोल माफ ी असतानाही बळजबरीने टोल वसुली सुरू होती. या दरम्यान जिल्हा परिषदेचे कृषी समितीचे सभापती अजय फ टांगरे हे तेथून जात असताना ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याबाबत टोल प्रशासनकडे विचारणा केली असता टोलनाक्याचे कर्मचारी योगेश भंडागे यांनी फटांगरे यांच्याविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मंगळवारी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.