व्याजासाठी जमीन लिहून घेणाऱ्या सावकारावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:51+5:302021-07-21T04:15:51+5:30

२०१५ रोजी फिर्यादीने स्टेशनरीचा धंदा टाकण्यासाठी पैशाची अडचण असल्याने आपल्या परिचयातील मध्यस्थाकडे पैशांची मागणी केली होती. मात्र मध्यस्थाने खासगी ...

An offense against a lender who writes off land for interest | व्याजासाठी जमीन लिहून घेणाऱ्या सावकारावर गुन्हा

व्याजासाठी जमीन लिहून घेणाऱ्या सावकारावर गुन्हा

२०१५ रोजी फिर्यादीने स्टेशनरीचा धंदा टाकण्यासाठी पैशाची अडचण असल्याने आपल्या परिचयातील मध्यस्थाकडे पैशांची मागणी केली होती. मात्र मध्यस्थाने खासगी सावकाराकडून सुपेकर यांना दोन लाख रुपये ४ रुपये टक्के व्याजदराने घेण्याचा सल्ला दिला. सावकार केदारी याने त्याबदल्यात फिर्यादीच्या मालकीची मधुकमल मंगल कार्यालयाच्या समोरील २० गुंठे जमीन मध्यस्थाच्या नावे करून देण्याचे ठरले होते. परंतु इच्छा नसताना सावकाराच्या बळजबरीने सावकारकीच्या पैशांमुळे ७ डिसेंबर २०१५ रोजी जमिनीचे खरेदी खत करून दिले. दुसऱ्या दिवशी केदारी यांनी फिर्यादीला दोन लाख रुपये ४ टक्के व्याजदराने आणून दिले. त्या पैशांचे चार महिन्यांचे आठ हजारप्रमाणे व्याज केदारी यांच्याकडे दिले. मात्र त्यानंतर फिर्यादीला वेळेवर व्याज देणे जमले नाही. त्यामुळे सावकाराने मध्यस्थांच्या नावावर असलेले क्षेत्र सावकाराची पत्नी छाया केदारी हिच्या नावावर करून देण्यास सांगितले. २३ जानेवारी २०१७ रोजी सदर क्षेत्र हे सावकाराच्या पत्नीच्या नावे करून देण्यात आले. मात्र खरेदी झाल्यानंतर फिर्यादीला ही बाब समजली. व्याज व मुद्दल दिल्यानंतर सदरील जमीन ही पुन्हा आपल्या नावे पलटून देण्याचे ठरले होते. त्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांनी सावकाराकडे जाऊन सर्व रक्कम परत देऊन जमीन पलटून देण्याची विनंती केली. मात्र सावकाराने त्याबदल्यात २५ लाख रुपये मागितले. तसेच २० गुंठ्यातील दोन गुंठे क्षेत्र सावकाराकडे कायम ठेवावे, अशी अट घातली. फिर्यादीने प्रतिष्ठित मंडळी, राजकीय मंडळी अनेकांना मध्यस्ती करायला लावले. मात्र सावकार आपल्या अटीवर ठाम होता. तसेच सावकाराने ७ जून २०२१ रोजी कर्जतच्या बँकेकडून नऊ लाखांचा बोजा चढवला. त्यानंतर सावकार हा कोकणगाव येथील एका इसमाला सदरील क्षेत्र २८ लाख रुपयांना विकत असल्याचे समजल्यावर फिर्यादीने सावकार सुखदेव केदारी, छायाबाई केदारी व इतर यांच्याविरोधात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलीस क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस नाईक बबन दहिफळे, प्रबोध हांचे, जितेंद्र सरोदे पुढील तपास करत आहेत.

Web Title: An offense against a lender who writes off land for interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.