रुग्ण संख्या घटली, नगर शहर दोनशेच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST2021-05-17T04:19:52+5:302021-05-17T04:19:52+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात आज ३,२९६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रविवारी जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत २,८८२ ने वाढ झाल्याने ...

The number of patients decreased, within two hundred in the city | रुग्ण संख्या घटली, नगर शहर दोनशेच्या आत

रुग्ण संख्या घटली, नगर शहर दोनशेच्या आत

अहमदनगर : जिल्ह्यात आज ३,२९६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रविवारी जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत २,८८२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ०१६ इतकी झाली आहे. नगर शहरातील दैनंदिन रुग्ण संख्या प्रथमच दोनशेच्या आत आली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २२४, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १,४०८ आणि अँटिजन चाचणीत १,२५० रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर २५, कर्जत १०, कोपरगाव ३२, नगर ग्रामीण ३६, नेवासा ३, पारनेर १, पाथर्डी ३, राहता २, राहुरी २९, संगमनेर १, श्रीगोंदा ६९, श्रीरामपूर ५, कॅंटोन्मेंट बोर्ड ४ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ९०, अकोले ९६, जामखेड ७८, कर्जत ४८, कोपरगाव ३६, नगर ग्रामीण १४८, नेवासा १०७, पारनेर ८५, पाथर्डी ४१, राहाता ९०, राहुरी ३९, संगमनेर २४२, शेवगाव १२८, श्रीगोंदा ३५, श्रीरामपूर १०४, कॅंटोन्मेंट बोर्ड २, इतर जिल्हा ३८ आणि इतर राज्य १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजन चाचणीत आज १,२५० जण बाधित आढळून आले. नगर शहर ५९, अकोले ६८, जामखेड ६४, कर्जत १५१, कोपरगाव ८६, नगर ग्रामीण ८६, नेवासा ७८, पारनेर ७४, पाथर्डी १२१, राहाता ७०, राहुरी ११०, संगमनेर ६७, शेवगाव ६०, श्रीगोंदा ८६, श्रीरामपूर ५९, कॅंटोन्मेंट ६ आणि इतर जिल्हा ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

----

२४ तासात ३१ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात रविवारी २४ तासात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दैनंदिन मृत्यू संख्येत गत आठवड्यात घट झाली होती. आज पुन्हा ३१ मृत्यूची पोर्टलवर नोंद झाली असल्याने चिंता वाढली आहे.

-----

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्ण संख्या: २,०७,१३८

उपचार सुरू असलेले रुग्ण: २२०१६

मृत्यू: २४८१

एकूण रुग्ण संख्या: २,३१,६३५

Web Title: The number of patients decreased, within two hundred in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.