कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या एक हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:36 IST2020-12-16T04:36:32+5:302020-12-16T04:36:32+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात सोमवारी (दि. १४) १५, तर मंगळवारी (दि. १५) १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ...

कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या एक हजार
अहमदनगर : जिल्ह्यात सोमवारी (दि. १४) १५, तर मंगळवारी (दि. १५) १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या १००१ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ६६ हजार ६७८ झाली आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे १.४ टक्के आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. दररोज एक ते दीड हजार जणांची चाचणी होते. त्यापैकी १०० ते १५० जण पॉझिटिव्ह येत आहेत. पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण १० टक्के आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत नसली तरी गंभीर रुग्णांचा मृत्यू होत असल्याने ही बाब चिंताजनक बनली आहे. सलग दोन दिवस रोज दहापेक्षा जास्त जणांचे मृत्यू झाले आहेत. यामुळे एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत असली तरी हे प्रमाण नगण्य असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणा सांगत आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६४ हजार ४६२ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ९६.६८ टक्के झाले आहे. जिल्ह्यात मंगळवारी १५१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॉझिटिव्ह आला, तर १८७ जणांना घरी सोडण्यात आले. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १२१५ आहे.
---------
मंगळवारी आढळले १५१ रुग्ण
मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ०८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४० आणि अँटिजन चाचणीत १०३, असे १५१ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये पारनेर (६), श्रीगोंदा (१३), अहमदनगर शहर (२९), अकोले (१), जामखेड (२), कर्जत (८), कोपरगाव (७), नेवासा (७), पाथर्डी (१७), राहाता (१२), राहुरी (६), संगमनेर (२१), शेवगाव (१) आणि श्रीरामपूर (२०) येथील रुग्णांचा समावेश आहे.
------------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : ६४४६२
उपचार सुरू असलेले रुग्ण : १२१५
मृत्यू : १००१
एकूण रुग्णसंख्या : ६६६७८
--------