शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

आता २०० लोकांच्या उपस्थितीत होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST

अहमदनगर : राज्य शासनापाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांनीही मोकळ्या जागेत लग्नसमारंभासाठी २०० जणांची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे लग्नासह, साखरपुड्यांच्या कार्यक्रमांनाही ...

अहमदनगर : राज्य शासनापाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांनीही मोकळ्या जागेत लग्नसमारंभासाठी २०० जणांची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे लग्नासह, साखरपुड्यांच्या कार्यक्रमांनाही आता गर्दी होऊ लागली आहे. दोनेशेची मर्यादा असली तरीही जास्त संख्येने लग्नसोहळे सुरू आहेत. निर्बंध शिथिल झाल्यामुळे मंगल कार्यालयातही उत्साहाला उधाण आले आहे.

कोरोनामुळे शाही आणि हजारो वऱ्हाडींच्या उपस्थितीत होणाऱ्या लग्नसमारंभांना ब्रेक लागला. आधी २०, ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा आता दोनशेपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र त्यासाठी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सध्या मुहूर्त नसल्याने लग्नसोहळे तीन महिने लांबणीवर पडले आहेत. मात्र कधी नव्हे ते निर्बंध शिथिल झाल्याने मुहूर्त न पाहता अनेकांचा कल लग्नसमारंभ उरकून घेण्यावरच आहे. ज्यांना मुहूर्तात लग्न करायचे आहेत, ते सध्या साखरपुड्यांचे कार्यक्रम दणक्यात करीत आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अहमदनगर जिल्ह्यात मात्र अद्यापही दैनंदिन रुग्णसंख्या ७०० ते ८०० च्या जवळपास आहे. डेल्टाच्या भीतीचे सावट आहे. मात्र बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत असून लग्नसोहळ्यांची संख्याही वाढली आहे.

-------------

लग्नसमारंभासाठी या आहेत अटी

मंगल कार्यालय: मंगल कार्यालयात लग्न करण्यासाठी तेथे वऱ्हाडी मंडळी जाण्यापूर्वी पूर्ण परिसर सॉनिटायझिंग करून घेणे, प्रत्येकाने मास्क परिधान करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आदी अटी घालण्यात आल्या आहेत.

लॉन : मंगल कार्यालये आणि लॉन परिसरासाठी सारखेच नियम लागू करण्यात आले आहेत. वऱ्हाड परराज्यातून येणार असेल तर त्यांची कोरोना चाचणी करून घेणे, तसेच वऱ्हाडी मंडळींनी कोरोना लसीकरण केले की नाही, हे तपासणे इतर आवश्यक ती माहिती कळविणे.

-------------

मंगल कार्यालयात उत्साहाला उधाण

लग्न व इतर समारंभांना २०० लोकांची परवानगी दिल्याने समाधान व्यक्त होत आहे. मंगल कार्यालय बुकिंग करण्यासाठी आता चौकशी मोठ्या प्रमाणावर होत आहे. लग्नांपेक्षा साखरपुड्याचे कार्यक्रम अधिक आहेत.

- सौरभ शिंदे, सारसनगर

----

कोरोना नियमावलीचे पालन केले जाते. वऱ्हाडी मंडळीसाठी आम्ही सॉनिटायझरची सोय उपलब्ध करून देतो. सर्वांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. याशिवाय अक्षतासोबत वधुवरांचे नातेवाईक मास्कही उपलब्ध करून देतात. सोशल डिस्टन्सिंगसह आम्ही आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या हातात ग्लोज, मास्क देतो. -दीनानाथ जाधव, नगर-मनमाड रोड

-------------

मुहूर्त तीन महिन्यांनी, गौण मुहूर्त भरपूर

लग्नाचे मुहूर्त जवळपास संपले असून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असे तीन महिने आता मुहूर्त नसून नोव्हेंबरमध्ये २०, २१, २९ आणि ३० असे विवाह मुहूर्त आहेत. मात्र गौण विवाह मुहूर्त मोठ्या प्रमाणावर असल्याने या मुहूर्तावर लग्न करण्यावर मोठा भर असल्याचे दिसते.

---

रोजी सुरू झाल्याने बॅंडवाले जोरात

कोरोनामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. भीतीपोटी कोणीही वाजंत्री लावत नव्हते. परंतु शासनाने नियम शिथिल केल्याने आता लग्नासाठी वाजंत्री, बॅंड लावले जात आहेत. ही चांगली गोष्ट असून लग्नावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांचे चक्र पुन्हा गतिशील होईल.

- गौरव राऊत, बॅंड कंपनी

-------------

लग्नाचे मुहूर्त संपल्यानंतर शासनाने नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. आजघडीला लग्नासाठी शुभमुहूर्त नाहीत. मात्र तीन महिन्यांनी तिसरी लाट आली तर मुहूर्त असून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे चांगला दिवस पाहून अनेक जण लग्नाच्या तारखा निश्चित करीत आहेत.

- किशोर जोशी, जिल्हा पुरोहित संघटना

-------------

डमी क्रमांक -१०५२