कुख्यात दरोडेखोर सचिन भोसले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 14:26 IST2018-09-09T14:26:09+5:302018-09-09T14:26:15+5:30

दरोड्यासह इतर गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात दरोडेखोर सचिन फुलचंद भोसले (रा.मोरेचिंचोरे. ता.नेवासा) यास सोनई गावात सापळा रचून सोनई पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.

The notorious robber Sachin Bhosale Jerband | कुख्यात दरोडेखोर सचिन भोसले जेरबंद

कुख्यात दरोडेखोर सचिन भोसले जेरबंद

नेवासा : दरोड्यासह इतर गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात दरोडेखोर सचिन फुलचंद भोसले (रा.मोरेचिंचोरे. ता.नेवासा) यास सोनई गावात सापळा रचून सोनई पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.
सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांना सदर फरार आरोपी भोसले हा सोनई येथे आला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकातील हनुमंत गर्जे, भटूअण्णा कारखेले, दत्ता गावडे, शिवाजी माने, किरण गायकवाड, बाबा वाघमोडे, विठ्ठल थोरात, अमोल भांड, आदिनाथ मूळे, मृत्यूंजय मोरे, सचिन ठोंबरे यांच्या पथकाने सोनई गावात सापळा रचून अट्टल दरोडेखोर भोसले यास अटक केली.
सोनई पोलीस ठाण्यात भादवी कलम ३९९,४०२,३४ व औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्यात भादवी कलम ३९५,१२० (ब) या गुन्ह्यात तो फरार होता.

Web Title: The notorious robber Sachin Bhosale Jerband