कुख्यात दरोडेखोर पांड्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:20 IST2021-01-25T04:20:45+5:302021-01-25T04:20:45+5:30

अहमदनगर : स्वस्तात सोन्याचे अमिष दाखवून लूटमार करणारा कुख्यात दरोडेखोर व मोक्काच्या गुन्ह्यात दीड वर्षापासून फरार असलेला पांड्या उर्फ ...

Notorious robber Pandya arrested | कुख्यात दरोडेखोर पांड्या जेरबंद

कुख्यात दरोडेखोर पांड्या जेरबंद

अहमदनगर : स्वस्तात सोन्याचे अमिष दाखवून लूटमार करणारा कुख्यात दरोडेखोर व मोक्काच्या गुन्ह्यात दीड वर्षापासून फरार असलेला पांड्या उर्फ पांडुरंग भारम भोसले (रा. पढेगाव, ता. कोपरगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पढेगाव येथून जेरबंद केले.

पांड्या व त्याच्या साथीदारांनी ७ जुलै २०१९ रोजी नाशिक येथील दिनेश दगडू पाटील यांना स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून १० लाख ७४ हजार रुपये लुटले होते. तसेच पांड्या याच्याविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दरोड्यासह विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, सहायक फौजदार मोहन गाजरे, हेडकॉस्टेबल बाळासाहेब मुळीक, पोलीस नाईक शंकर चौधरी, विशाल दळवी, दीपक शिंदे, राहुल सोळुंके, रणजित जाधव, रोहित यमुल, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Notorious robber Pandya arrested