कुख्यात दरोडेखोर एवन हैवान काळेची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:21 IST2021-05-08T04:21:47+5:302021-05-08T04:21:47+5:30

टोळीप्रमुख एवन हैवान काळे, मनीषा एवन काळे, कांचन एवन काळे (सर्व रा.चिखली, ता.आष्टी, जि.बिड), रेखा जनार्दन काळे यांच्यासह एका ...

Notorious robber Avon Haiwan black gang arrested | कुख्यात दरोडेखोर एवन हैवान काळेची टोळी जेरबंद

कुख्यात दरोडेखोर एवन हैवान काळेची टोळी जेरबंद

टोळीप्रमुख एवन हैवान काळे, मनीषा एवन काळे, कांचन एवन काळे (सर्व रा.चिखली, ता.आष्टी, जि.बिड), रेखा जनार्दन काळे यांच्यासह एका अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे. या टोळीने ५ मे रोजी कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथील मीना सर्जेराव महारनवर यांच्या घरी दरोडा टाकून दोघांना मारहाण करत ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेनंतर कर्जत पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोडेखोरांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद केले. आरोपींकडून गुन्ह्यात चोरलेल्या मुद्देमालासह एकूण २० लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी एवन काळे याच्याविरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Notorious robber Avon Haiwan black gang arrested