नगरमध्ये कुख्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 15:02 IST2020-03-21T15:02:18+5:302020-03-21T15:02:49+5:30
नगर-सोलापूर रोडवरील वाळुंज शिवारात शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुख्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली. कारवाईदरम्यान सात जणांना अटक करण्यात आली असून एक फरार झाला आहे.

नगरमध्ये कुख्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद
अहमदनगर : नगर-सोलापूर रोडवरील वाळुंज शिवारात शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुख्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली. कारवाईदरम्यान सात जणांना अटक करण्यात आली असून एक फरार झाला आहे.
अटल उर्फ अतुल उर्फ योगेश ईश्वर भोसले (वय २३), सोन्या उर्फ लाल्या उर्फ राजेंद्र ईश्वर भोसले (वय २५), पल्या उर्फ जमाल ईश्वर भोसले (वय २०), मटक उर्फ नवनाथ ईश्वर भोसले (वय १९), ईश्वर गणा भोसले (वय ५२ सर्व रा. बेलगाव शिवार, ता़. कर्जत) व जितेंद्र संसार भोसले (रा. रुई नालकूल, ता. आष्टी, जि़. बीड) असे अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक तलवार, दोन कटावणी, एक सुरा, दोन लाकडी दांडे, वायरोप, कटर, मिरची पुडी, चार मोटारसायकली असा एकूण २ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दरोडेखोरांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेले दरोडेखोरांवर नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, एलसीबीचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.