निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर १२३ कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:52 IST2021-01-13T04:52:08+5:302021-01-13T04:52:08+5:30
तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. निवडणुकीत ८३ हजार १९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एक हजारांहून ...

निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर १२३ कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस
तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. निवडणुकीत ८३ हजार १९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एक हजारांहून अधिक उमेदवार यासाठी रिंगणात आहेत. तत्पूर्वी मतदान सुरळीतरीत्या पार पाडण्यासाठी ६ जानेवारी रोजी खासदार गोविंदराव आदिक नाट्यगृह येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, तसेच शिपाई अशा कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. तालुक्यासाठी एकूण ८५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र, असे असले तरी १५ केंद्राध्यक्ष, २७ सहायक केंद्राध्यक्ष, ५० मतदान अधिकारी व ३१ शिपायांनी प्रशिक्षणाला दांडी मारली. या सर्व कर्मचाऱ्यांना आता गैरहजेरीमागील कारण तहसीलदार पाटील यांच्याकडे द्यावे लागणार आहे. त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल.