ड्रेसची सक्ती नसून केवळ आवाहन
By | Updated: December 5, 2020 04:36 IST2020-12-05T04:36:12+5:302020-12-05T04:36:12+5:30
मुश्रीफ यांनी गुरुवारी (दि.३) साईदरबारी हजेरी लावली. त्यावेळी मुश्रीफ बोलत होते. यावेळी संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ...

ड्रेसची सक्ती नसून केवळ आवाहन
मुश्रीफ यांनी गुरुवारी (दि.३) साईदरबारी हजेरी लावली. त्यावेळी मुश्रीफ बोलत होते.
यावेळी संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष महेंद्र शेळके, नीलेश कोते, संदीप सोनवणे, रमेशराव गोंदकर, राकेश कोते, सुधीर म्हस्के, विशाल भडांगे, नंदू सदाफळ आदींची यावेळी उपस्थिती होती.
मुश्रीफ म्हणाले, साईसंस्थानचे विश्वस्त मंडळ लवकरच नेमले जाईल. कोरोनामुळे विलंब झाला. मात्र, मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करून नेमणूक करू. साई संस्थानचे सीईओ सातत्याने बदलत आहे. अधिकारी चांगले काम करीत असतील तर त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत बदली करू नये यासाठीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. साई मंदिर खुले झाल्यानंतर मुश्रीफ यांनी आज पहिल्यादाच दर्शन घेतले. दोनदा दर्शनासाठी येऊनही मंदिर बंद असल्याने त्यांना दर्शन घेता आले नव्हते.
०३हसन मुश्रीफ