रूई छत्रपती आरोग्य केंद्राकडे जाण्यासाठी ना रस्ता, ना एसटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:18 IST2021-04-03T04:18:25+5:302021-04-03T04:18:25+5:30

सुपा : पारनेर तालुक्यातील १३ गावांना शासकीय वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी रूई छत्रपती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. येथे ...

No road, no ST to go to Rui Chhatrapati Health Center! | रूई छत्रपती आरोग्य केंद्राकडे जाण्यासाठी ना रस्ता, ना एसटी !

रूई छत्रपती आरोग्य केंद्राकडे जाण्यासाठी ना रस्ता, ना एसटी !

सुपा : पारनेर तालुक्यातील १३ गावांना शासकीय वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी रूई छत्रपती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. येथे जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड कसरत करावी लागते. केंद्राकडे जाण्यासाठी ना व्यवस्थित रस्ता, ना एसटी बस, ना खासगी वाहनाची सुविधा अशी परिस्थिती आहे.

रूई छत्रपती गावाकडे जाण्यासाठी पूर्वी एकच बस होती. लॉकडाऊन सुरू झाले तशी बस बंद झाली. त्यानंतरही ही बस सुरू झालीच नाही. शासकीय दवाखान्यात मोफत उपचार, लसीकरण, अन्य आरोग्यविषयक सेवा-सुविधा पुरविल्या जातात. सर्वसामान्य जनता याचा लाभ घेते. त्यांना येथील सुविधांचा लाभ घेण्यासाठी पाेहोचणेच अवघड होऊन बसल्याची खंत शहाजापूरचे माजी सरपंच अण्णा मोटे यांनी व्यक्त केली.

रूई छत्रपती गावाकडे जाण्यासाठी खासगी वाहन सुविधा नाही. खराब झालेल्या रस्त्यावरून जाताना प्रवाशांना कसरत करावी लागते. त्यातून वाहनांचे होणारे नुकसान याचा विचार करता कुणीही फारसे इकडे फिरकत नाही. त्यामुळे कुणाला तरी कमी जास्त प्रवास भाडे देऊन उपचारासाठी, लस घेण्यासाठी घेऊन जावे लागते असे एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले.

पहिल्या टप्प्यात ६० वर्षावरील ज्येष्ठांसाठी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली. त्यात रूई छत्रपती आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या रुईसह, बाबुर्डी, रायतळे, वाळवणे, रांजणगाव रोड, पिंपरी गवळी, अस्तगाव, हंगा, मुंगशी, लोणी हवेली, सुपा, आपधूप, शहाजापूर या गावातून १ हजार २६६ नागरिकांनी लस घेतल्याची माहिती आरोग्य कर्मचारी संजय साठे यांनी दिली. रूई छत्रपती येथील सरकारी आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी किमान दिवसातून तीन वेळा बससेवा उपलब्ध होणे गरजेचे आहे. वाळवणे ते रूई या खराब झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी सुपा परिसरातील गावातील नागरिकांमधून होत आहे.

--

वाळवणे ते रूई छत्रपती रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी केली. खड्डे भरण्याचे काम तातडीने सुरू करणार आहे.

-नाना अहिरे,

उपअभियंता, जिल्हा परिषद

--

०२ रूईछत्रपती

वाळवणे गावावरून रूई छत्रपतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असे खड्डे पडले आहेत.

Web Title: No road, no ST to go to Rui Chhatrapati Health Center!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.