शैक्षणिक गुणवत्तेसाठी राजकीय दृष्टिकोन नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:21 IST2021-03-08T04:21:40+5:302021-03-08T04:21:40+5:30

जामखेड : शिक्षण क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थी व समाजहित लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. त्यासाठी राजकीय दृष्टिकोन ...

No political approach to educational quality | शैक्षणिक गुणवत्तेसाठी राजकीय दृष्टिकोन नको

शैक्षणिक गुणवत्तेसाठी राजकीय दृष्टिकोन नको

जामखेड : शिक्षण क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थी व समाजहित लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. त्यासाठी राजकीय दृष्टिकोन न ठेवता विद्यार्थी व शैक्षणिक गुणवत्ता साधली पाहिजे. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी आमदार रोहित पवार हे शैक्षणिक क्रांती करण्याचे काम करत आहेत, असे मत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले.

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या फिरते तारांगण प्रकल्पाचे उद‌्घाटन मुंबई येथे झाले. यावेळी त्या बोलत होत्या. कर्जत-जामखेड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन या विषयात आवड निर्माण व्हावी यादृष्टीने सफर अंतराळाची तसेच शालेय विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी डिजिटल इंटरॅक्टिव क्लास रूम तयार करण्यात आले आहेत. या प्रकल्पाचाही लोकार्पण सोहळाही मुंबई येथे नुकताच पार पडला. कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे हे फिरते तारांगण व टेलिस्कोप प्रत्येक शाळेमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

---

आणखी २०० डिजिटल इंटरॅक्टिव पॅनल

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने अभ्यासक्रम समजावा आणि त्यांनी डिजिटल शिक्षण आत्मसात करावे यासाठी कर्जत-जामखेडच्या जिल्हा परिषद शाळांना यापूर्वीही २०० डिजिटल इंटरॅक्टिव पॅनल देण्यात आले होते. आता उर्वरित २०० शाळांमध्येही डिजिटल इंटरॅक्टिव पॅनल दिले जाणार आहेत, असे पवार यांनी सांगितले.

Web Title: No political approach to educational quality